मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वंदे मातरम्' वरून मुनगंटीवारांचा यूटर्न? शासकीय कार्यालयाबाबतच्या त्या निर्णयावर आता म्हणतात...

'वंदे मातरम्' वरून मुनगंटीवारांचा यूटर्न? शासकीय कार्यालयाबाबतच्या त्या निर्णयावर आता म्हणतात...

Sudhir Mungantiwar Vande Mataram

Sudhir Mungantiwar Vande Mataram

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलोऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं होतं.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 15 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हॅलोऐवजी वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावं, असं आवाहन केलं होतं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या आवाहनामुळे वाद निर्माण झाला होता, यावरून आता मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असं म्हणलेलं नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. 'इंग्रजांकडून किंवा परदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, असं अभियान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाने सुरू केलं आहे. वंदे मातरम् ऐवजी कुणी राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा तोडीचा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. हॅलो शब्द रझा अकादमीसाठी देशभक्तीला प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित होत नाही. आम्ही असा कोणताही कायदा केलेला नाही,' असं मुनगंटीवार म्हणाले. रझा अकादमीने हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक फोन केल्यावर जय महाराष्ट्र म्हणतात, आता मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवारांना काय म्हणायचं ते विचारावं, असा टोला भुजबळ यांनी हाणला होता. ...तर मी वंदे मातरम म्हणणार नाही, आपण ज्या ऑर्डर काढतो त्याचे भान ठेवायला हवे, छगन भुजबळांची जोरदार टीका काय म्हणाले होते मुनगंटीवार? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. या खातेवाटपामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्री करण्यात आलं. सांस्कृतिक मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना केल्या होत्या. सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात वंदे मातरम् म्हणण्याबाबतची दोन ट्वीट केली होती, यातल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी आवाहन करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला होता. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप झालं, यामध्ये मुनगंटीवार यांना सांस्कृतिक मंत्रीपद मिळालं. सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा निर्णय घेतला होता.
First published:

पुढील बातम्या