फडणवीसांची परीक्षा: 18 अपक्ष आमदारांकडून पाठिंबा, सुधीर मुनगंटीवरांचा मोठा दावा

फडणवीसांची परीक्षा: 18 अपक्ष आमदारांकडून पाठिंबा, सुधीर मुनगंटीवरांचा मोठा दावा

राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये बहुमताचा आकडा कसा गाठायचा यावर चर्चा करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सध्याच्या सत्तास्थापनेच्या पेचात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत भाजपला पुरेसं संख्याबळ म्हणजे 145 चा आकडा सिद्ध करावं लागेल. पण भाजपकडे 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे.

शिवसेना आणि भाजपला जनादेश मिळाला आहे. पण शिवसेनासोबत येण्यास तयार नाही. पण आम्हाला दुसरा पर्याय नसून शिवसेनेसोबतच बहुमत सिद्ध करण्याची इच्छा असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, भाजपकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. एकून 18 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अजून 22 आमदारांची गरज आहे. बहुमताचा हा आकडा कसा गाठायचा यावर उद्याच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करू अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणावर उद्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये बहुमताचा आकडा कसा गाठायचा यावर चर्चा करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान, ज्यांच्याविरोधात आम्ही निवडणुका लढल्या त्यांच्याशी हातमीळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. तर बहुमतासाठी आता शिवसेनेनं पुढाकार घेणं महत्त्वाचं असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

इतकंच नाही तर स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला कोणाच्या दरवाजात जाण्याची गरज नाही. जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे आम्ही कोणच्याही दाराज जाणार नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्यामध्ये राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राज्यपालांनी भाजपला केलं सत्तास्थापनेसाठी पाचारण

राज्यातील 2014 च्या विधानसभेचा कार्यकाळ शुक्रवारी संपला. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांकडेच कार्यभार आहे.  कोणत्याही राजकीय पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नसल्याने भाजपला निमंत्रित करण्यात आलं आहे.  यानंतर नव्या सरकारला बहुमत देण्यासाठी  30 दिवसांचा वेळ दिला जाऊ शकतो.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेलं भाष्य आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे युतीचे संबंध आणखी ताणले गेले. आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे.

शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. युतीचं भविष्य काय असेल असं विचाल्यावर युतीच्या नेत्यांना वडिलकीच्या नात्याने सल्लाही त्यांनी दिला. "एक वडील म्हणून माझा सल्ला आहे. कुणी कुणाला खोटं ठरवू नये. 30 वर्षं ते एकमेकांबरोबर आहेत." "सेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार आम्ही अद्याप केलेला नाही. आम्ही अजून याची चर्चाही केलेली नाही. राज्यपाल काय करतात ते आम्ही बघतो. लवकरात लवकर स्थिर सरकार राज्यात येणं आवश्यक आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 08:08 PM IST

ताज्या बातम्या