आधार लिंक करताना हरवलेलं नातं पुन्हा झालं 'लिंक', पहा VIDEO

आधार लिंक करताना हरवलेलं नातं पुन्हा झालं 'लिंक', पहा VIDEO

चार वर्षांपूर्वी शिंदे कुटुंबातला हरवलेला मुलगा, मच्छिंद्र अचानक सापडला आहे. मच्छिंद्र कसा सापडला याची कथा तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल इतकी रंजक आहे. एखाद्या सिनेमातल्या स्टोरी वाटावी अशी ही घटना घडली. यावर खरंच विश्वास बसत नाही.

  • Share this:

बीड, 2 मार्च: आई-वडिलांपासून ताटातूट झालेल्या लेकराची तब्बल चार वर्षांनी भेट झाली. हरवलेला मुलगा कधी सापडेल या चिंतेत असलेल्या माजलगावच्या शिंदे कुटुंबात पुन्हा आनंद निर्माण झाला. बीड जिल्ह्यातील शिंदे कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सध्या खूप आनंद आणि समाधान पाहायला मिळतंय. अर्थात त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण चार वर्षांपूर्वी शिंदे कुटुंबातला हरवलेला मुलगा मच्छिंद्र अचानक सापडला आहे. मच्छिंद्र कसा सापडला याची कथा तुम्हाला तोंडात बोट घालायला लावेल इतकी रंजक आहे. एखाद्या सिनेमातल्या स्टोरी वाटावी अशी ही घटना घडली. यावर खरंच विश्वास बसत नाही. पण हे प्रत्यक्षात घडलं आहे. आपलं नाव सुद्धा धड न सांगता येणारा या मुलाला अनाथाश्रमात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा त्याचा ठाव ठिकाणा शोधायचं ठरलं, आधारकार्ड तर काढून नामकरण करण्याचा निर्णय झाला तेव्हा जे घडलं, त्यामुळे अनाथाश्रमाच्या व्यवस्थापकांना धक्काच बसला.

नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ पाहाच.

हे नक्की पहा :

First published: March 2, 2020, 9:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या