नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान

नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान

आर्थिक नुकसानीत अधिक भर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त

  • Share this:

30 एप्रिल : नाशिकमधल्या सटाणा तालुक्यात अनेक गावात वादळी वाऱ्यासहीत अवकाळी पाऊस आणि गारपीटदेखील झाली.नांदूर शिंगोटे, देवगाव मंडळ, रानवड मंडळ, ओझर मिग या भागांमध्येही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक नुकसानीत अधिक भर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाचा तडाखा इतका जबरदस्‍त आहे की, काही क्षणातच अक्षरश: गारांचा खच रस्‍त्‍यावर पडलेला दिसत आहे.

दरम्यान, शनिवारी कोल्हापूर, सांगली आणि मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने परिसराला अक्षरक्ष: झोडपून काढले.

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालंय, तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मापाविना बाजार समितीत पडून असलेली हजारो क्विंटल तूर भिजली. उस्मानाबाद जिल्ह्यातही गारांसह अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कळंबसह राजुरी, कोंड, ढोकी आणि तडवळे गावात गारांसह पाऊस झालाय. या पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसल्याचं सांगण्यात येतंय.

कोल्हापूर आणि बेळगाव भागातही शनिवारी संध्याकाळी वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर गावात तर जोरदार गारांसह पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी गारांचा थर साचल्याने उत्तूरकरांनी बर्फाळ परिस्थीती पहिल्यांदाच अनुभवली...या पावसामुळे उस पिकाला फायदा झाला मात्र आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

First published: April 30, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading