Success Story: होती ३ मोठ्या सरकारी नोकऱ्यांची ॲाफर पण दिला नकार, अखेर शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS

Success Story: होती ३ मोठ्या सरकारी नोकऱ्यांची ॲाफर पण दिला नकार, अखेर शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS

यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत खडतर असाच असतो. आयएस अधिकारी शिवप्रसाद मदन नकाते यांची ही कहाणी

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : यशस्वी व्यक्तीच्या मागे नेहमी एखाद्या स्त्रीचा हात असतो असं आपण नेहमी म्हणतो. परंतु, त्या व्यक्तीचा यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास हा अत्यंत खडतर असाच असतो. आयएस अधिकारी शिवप्रसाद मदन नकाते यांची कहाणीही अशीच आहे.

शिवप्रसाद मदन नकाते हे जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील रहिवासी आहे. करिअरच्या उमेदीच्या काळात त्यांना तीन वेगवेगळ्या मोठ्या नोकऱ्यांची ऑफर मिळाली होती. पण त्यांनी त्या नोकऱ्या करण्यास नकार दिला. आयएएस अधिकारी व्हायचंच असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याच ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी जोमाने तयारी केली. विशेष म्हणजे, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी IAS ची परीक्षा पास केली.

शिवप्रसाद यांचा जन्म हा एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपण हे त्यांचं गावात गेलं. त्यांचे वडील मदन नकाते हे एक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते  आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शिवप्रसाद यांनीही सामाजिक कामांना सुरुवात केली. तालुक्यातील अनेक गोरगरीब आणि गरजू लोकांची ते मदत करत होते.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी 10 वीपर्यंत शिक्षण घेतलं. शिक्षणाच्या दरम्यानच त्यांना यूपीएससी परीक्षा पास करून सरकारी अधिकारी व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगलं आणि मोठं झाल्यावर स्वप्न हे सत्यातही उतरलं.

शिवप्रसाद यांनी शिक्षण सुरू असताना एका वेळेस बीडीएस आणि दुसऱ्यांदा आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली होती. त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, त्यांनी डाॅक्टर व्हावं आणि गावाची सेवा करावी.

मुलगा डाॅक्टर झाला तर गावात कुटुंबाची शेतीही सांभाळेल. पण आयएएस अधिकारी होण्याचं शिवप्रसाद यांचं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी बीडीएस आणि आयआयटीला प्रवेश घेतला नाही. तसंच ग्रामीण भागातून असल्यामुळे जवळपास कोणते कोचिंग सेंटरही नव्हते आणि शहरात जाणे शक्यही नव्हते. त्यानंतर आयएएसच्या परीक्षेच्या तयारीला लागले. अभ्यासादरम्यान त्यांनी मोबाइल फोन सुद्धा टाळला होता. दररोज ते नित्यनियमाने वृत्तपत्राचं वाचन करत होते.

शिवप्रसाद हे दररोज १० तास स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. २०१० मध्ये राज्य वन सेवा, महाराष्ट्र प्रशासन सेवा आणि सेंट्रल पोलीस दलात सहाय्यक निरीक्षक पदाची परीक्षा पास करून निवड झाली. पण शिवप्रसाद यांना आयएएस अधिकारीच व्हायचं होतं. त्यामुळे त्यांनी तिन्ही कोणतीही सरकारी नोकरी स्वीकारली नाही. राज्य सरकारकडून ५० विद्यार्थ्यांची बॅच तयार करण्यात आली. यात त्यांनी सेल्फ स्टडीवर लक्ष देऊन पुढची तयारी केली. २०१० मध्ये अखेर आयएएसची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं. २०११ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली. सध्या ते राजस्थान जिल्हातील श्रीगंगानगर इथं जिल्हाधिकारी आहे. याआधी त्यांनी बाडमेर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते.

First Published: Jan 14, 2020 08:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading