औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंच्या अपयशाचा पाढा घेऊन मतदारांसमोर आले सुभाष झांबड

औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंच्या अपयशाचा पाढा घेऊन मतदारांसमोर आले सुभाष झांबड

चंद्रकांत खैरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तारणार की बुडवणार.? सुभाष झांबड यांचा विकासाचा मुद्दा संसदेचे दार उघडणार का? सुभाष झांबड आणि चंद्रकांत खैरे यांच्या नशिबाचा फैसला 23 एप्रिलला होणार आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 9 एप्रिल- औरंगाबादमध्ये शिवसेनाविरुद्ध काँग्रेस अशी टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात काँग्रेसाने सुभाष झांबड यांना मैदानात उतरविले आहे. चंद्रकांत खैरे यांचा हिंदुत्त्वाचा मुद्दा तर सुभाष झांबड हे खैरेंच्या विकासकामाच्या अपयशाचा पाढा घेऊन मतदारांसमोर आले आहे.

खैरे मागील चार टर्म खासदार आहेत तर सुभाष झांबड हे विधान परिषदेचे आमदार आहेत. अब्दुल सत्तार यांनी उपसलेले बंडखोरीचे हत्यार पुन्हा म्यान केल्याने सुभाष झांबड यांच्या समोरील मोठे संकट दूर झाले आहे. दुसरीकडे, चंद्रकांत खैरे यांच्या समोर हर्षवर्धन जाधव यांच्या बंडाचे आव्हान आहे.

औरंगाबादमध्ये 18 लाख मतदार आहेत. औरंगाबाद मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाचा मुद्दा घेऊन खैरे मतदारांसमोर आले आहे. चंद्रकांत खैरे यांच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला सुभाष झांबड कसा छेद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चंद्रकांत खैरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा तारणार की बुडवणार.? सुभाष झांबड यांचा विकासाचा मुद्दा संसदेचे दार उघडणार का? सुभाष झांबड आणि चंद्रकांत खैरे यांच्या नशिबाचा फैसला 23 एप्रिलला होणार आहे.

VIDEO : शरदराव, तुम्हाला शोभतं का? मोदींनी का विचारला पवारांना सवाल

First Published: Apr 9, 2019 08:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading