श्रीमंत व्हायचं असेल तर कांदा खाऊ नका - पणन मंत्री सुभाष देशमुखांचा अजब सल्ला!

श्रीमंत व्हायचं असेल तर कांदा खाऊ नका - पणन मंत्री सुभाष देशमुखांचा अजब सल्ला!

एकीकडे कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल झाला असताना राज्यांच्या पणन मंत्र्यांनीच कांदा खाऊ नये असा अजब सल्ला दिला.

  • Share this:

इंदापूर,ता.06 मे: एकीकडे कांद्याचे भाव पडल्यानं शेतकरी हवालदिल झाला असताना राज्यांच्या पणन मंत्र्यांनीच कांदा खाऊ नये असा अजब सल्ला दिला. राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी कांद्याचे भाव वधारण्यासाठी पाऊलं उचलण्याऐवजी अकलेचे कांदे तोडण्यात धन्यता मानली.

जैन समाजाप्रमाणे कांदा खाऊ नका तुमची देखील उन्नती होईल असं बेताल वक्तव्य सुभाष देशमुखांनी केलंय. इंदापूरमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

कांदा थोडा महाग झाला की लगेच कांद्याने डोळ्यात पाणी आणलं असं लिहिलं जातं. वर्षभर कांदा खाल्लाच नाही तर बिघडलं कुठे? जैन समाज तर कांदाच खात नाही, त्यामुळच त्यांनी आर्थिक प्रगती केली, तुम्ही कांदा खात असल्यानं तुमची प्रगती झाली नाही असा अजब युक्तीवादही त्यांनी केला.

थोडा जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत असेल तर मिळू द्या त्याबद्दल जास्त गजहब करण्याचं कारण नाही हे सांगण्यासाठी चुकीचं उदाहरण दिल्यानं त्यांनी नवा वाद ओढवून घेतला. कांदा खेरेदीच्या शुभारंभ कार्यक्रमात जर मंत्रीच कांदा खावू नका नका असा सल्ला देत असेल तर करायचं काय अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

First published: May 6, 2018, 8:55 PM IST

ताज्या बातम्या