‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार

‘काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ भामरेंचा गोटे यांच्यावर पलटवार

‘मला जातीमुळे तिकीट मिळालं नसून मेरीटमुळे मिळालं आहे. भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही. पण काही विकृत लोकं विनाकारण टीका करतात,’ असं म्हणत सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

धुळे, 16 नोव्हेंबर : धुळे जिल्हातला भाजपमधील वाद दिवसेंदिवस आणखीनच धुमसताना दिसत आहे. आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिलं आहे. ‘अनिल गोटे यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतली आहे काय,’ असा सवाल यावेळी सुभाष भामरे यांनी केला.

‘मला जातीमुळे तिकीट मिळालं नसून मेरीटमुळे मिळालं आहे. भाजपमध्ये जातीचं राजकारण चालत नाही. पण काही विकृत लोकं विनाकारण टीका करतात,’ असं म्हणत सुभाष भामरे यांनी आमदार गोटेंवर निशाणा साधला आहे.

भामरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

-पैसे कमावणे उद्देश नाही

-जे आयुष्यात कमावले त्याचा लाभ धुळ्याला व्हावा

-सर्व्हेत प्रतिबिंबित झाले म्हणून निवडणूक लढलो.

- नाशिक आणि जळगाव पुढे निघुन गेले. धुळेकर दु:खी होते म्हणून विकासासाठी निवडणूक लढलो

-रेल्वे आणली ही माझी चूक आहे का?

- माझ्या द्वेषात ते (आमदार गोटे) आंधळे झालेत

- अनिल गोटे हे मुख्यमंत्र्यांना आणि पक्षाला खोट ठरवतात

- धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनमाड-इंदोर रेल्वेचा मार्ग

- कॉंग्रसची सुपारी घेतली आहे का?

-मला मार्केटिंग करता येत नाही

- प्रामाणिकपणाची दखल पक्ष नक्की घेतो.

-मला जातीच्या मुद्द्यावर तिकीट मिळालं, हे खोटं आहे

- भाजपात जातीवाद चालत नाही

-गोटे यांच्यावरही तेलगी घोटाळ्याचा आरोप होता.

- आमदार गोटे यांच्यावरही गंभीर आरोप असतानाही पक्षाने प्रवेश देऊन पवित्र करून घेतलं

दरम्यान, आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहून पक्षावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने संतापलेल्या गोटे यांनी आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांना पत्र लिहून अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत.

'भाजपमध्ये छोटा राजन आणि दाऊदशी संबंधीत गुंडाना प्रवेश दिला जातो, विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडेंनी पैसे वाटले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्याचा डाव फसला. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही,' असे अनेक आरोप आपल्या सात पानी पत्रात अनिल गोटेंनी केले आहेत. गोटेंच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

First published: November 16, 2018, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading