Home /News /maharashtra /

यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचाच विरोध, सुरू झाले अनोखे आंदोलन

यूजीसीच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचाच विरोध, सुरू झाले अनोखे आंदोलन

महाराष्ट्रातील covid-19 ची परिस्थिती पाहता राज्य सरकारने पदवीधर अभ्यासच्या अंतिम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणार नाही, असं केंद्रा कळवले

बीड, 13 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पण, यूजीसीने अंतिम वर्षाची सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी समोर येऊन उघडपणे यूजीसीच्या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन केले आहे. आज विद्यार्थ्यांनी राज्यभरात ई-मेल आंदोलन पुकारले आहे.  राज्यातील 25 हजार विद्यार्थी घरूनच या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विद्यार्थी कृती समितीने दावा केला आहे. परीक्षा धोरणाचा निषेध करण्यासाठी ई-मेल द्वारे प्रत्येक विद्यार्थी यूजीसीला निवेदन पाठवत आहे. भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, हत्या की आत्महत्या? पदवीच्या परीक्षाचा गोंधळ गेल्या 4 महिन्यापासून मार्गी लागलेला नाही, महाराष्ट्रातील covid-19 ची परिस्थिती पाहता राज्य सरकारने पदवीधर अभ्यासच्या अंतिम सत्रात असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेता येणार नाही, असं केंद्रा कळवले. मात्र, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षाघेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या विरोधात हे आंदोलन होत आहे. कोरोना संकटात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या तर त्यांच्या त्यांच्या जीवाशी खेळ होईल, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचा धोका वाढेल. यामुळे यूजीसीने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी  विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. Airtel, Vodafone-Idea ग्राहकांसाठी मोठी बातमी, ट्रायने ब्लॉक केले 'हे' प्लॅन्स दरम्यान, यूजीसीच्या निर्णयानंतर राज्य सरकारनेही अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार नाही, असं स्पष्ट केले आहे. यूजीसी ने दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची राज्य आपत्ती व्यवस्थापनातील अधिकार्यांसोबत मंत्रालयात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पदवी परीक्षेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसदर्भात आढावा घेण्यात येणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या