सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे शासनाने शाळा, महाविद्यालय बंद ठेवली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. मात्र, अकोल्यातील बोडखा गावात मोबाईल नेटवर्कच नाही. त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पाण्याच्या टाकीची मदत घ्यावी लागते. पाण्याच्या टाकीवर चढल्यावर नेटवर्क मिळत असल्याने, ठराविक वेळेत विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर चढतात आणि अभ्यास करता, हे वास्तव समोर आलंय. अशाप्रकारे पाण्याच्या टाकीवर चढून विद्यार्थ्यांचं अभ्यास करणे, धोकादायक आहे. परंतु, धोका पत्कारून विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो हे आपलं दुर्दैवच आहे, असं बोडखा शाळेतील शिक्षक रणजित राठोड म्हणाले. कोरोनाच्या पार्शवभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने आणि मोबाईल कंपन्यांनी नेटवर्कची सुविधा आणखी सुधारावी अशी मागणी होत आहे. देशाचे भविष्य विद्यार्थी आहेत, मात्र, याच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्यात मोबाईल नेटवर्कमुळे अंधार होण्याची वेळ आली आहे.#अकोला : विद्यार्थी पाण्याचा टाकीवर चढून करताय 'विरू'गिरी pic.twitter.com/RYlooMM4yA
— News18Lokmat (@News18lokmat) October 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.