औरंगाबाद विद्यापीठाचा भोंगळ कारभार; गोदामात दिले विद्यार्थ्यांनी पेपर

औरंगाबाद विद्यापीठाचा भोंगळ कारभार; गोदामात दिले विद्यार्थ्यांनी पेपर

बी.एससी आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना चक्क एका गोदामात आणि तेही जमिनीवर बसून पेपर द्यावे लागत आहेत

  • Share this:

औरंगाबाद,10 नोव्हेंबर: मराठवाड्यातील एक नामवंत विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांना गोदामात जमिनिवर बसून पेपर द्यायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

विश्वास बसणार नाही मात्र बी.एससी आणि बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना चक्क एका गोदामात आणि तेही जमिनीवर बसून पेपर द्यावे लागत आहेत. हे परीक्षा विभागात नियोजनाच्या असलेल्या अभावामुळे घडतं आहे. विद्यार्थ्यांवर असं जमिनीवर बसून एका गोदामात पेपर देण्याची वेळ आलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा परीक्षा विभाग हा नेहमीच वादात राहिलाय. त्यातच आता गोदामात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावल्याची घटना समोर आली आहे.

आता यानंतर तरी काही कारवाई होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 10, 2017, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading