एमडी आणि एमएसच्या कोर्सच्या फीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ, पालकांमध्ये नाराजी

एमडी आणि एमएसच्या कोर्सच्या फीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ, पालकांमध्ये नाराजी

  • Share this:

11 मे : खाजगी मेडिकल कॉलेजांच्या फीवाढीविरोधात पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एमडी आणि एमएसच्या कोर्सची फी अव्वाच्या सव्वा वाढवून मेडिकल कॉलेजेसनी वैद्यकीय शिक्षणाचा बाजार मांडला आहे.

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या भरमसाठ फी वाढीनं यंदा पालकांचं कंबरडं मोडणार असंच दिसतंय. खाजगी व्यावसायिक वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क निश्चितीमधील गोंधळाचा फायदा संस्थाचालक घेताना दिसताहेत. त्यांनी एमडी आणि एमएसच्या कोर्सची फी प्रचंड प्रमाणात वाढवली आहे. यावर या संस्थाचालकांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही विचारणा केली असता, त्यावर कुणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.

आता आपण एक नजर टाकूयात कशा पद्धतीनं ही फी वाढ करण्यात आली आहे त्यावर

 फी वाढीचा डोंगर :

----------------------------------------------------

महाविद्यालय                               फीवाढ

----------------------------------------------------

काशीबाई नवले                          96 लाख

के जे सोमय्या                             55 लाख

तेरणा मेडिकल कॉलेज                17.4 लाख

डी वाय पाटील (नवी मुंबई)           25.5 लाख

प्रवरा इन्स्टिट्यूट                          21 लाख

भारती विद्यापीठ (पुणे)                  26 लाख

----------------------------------------------------

खाजगी महाविद्यालयातील शुल्क निश्चितीवर ना सरकारचे नियंत्रण आहे ना शुल्क नियंत्रण प्राधिकरणाचं नियंत्रण आहे. यामुळंच वैद्यकीय शिक्षणाला एक प्रकारे बाजारीकरणाचं स्वरूप आल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. यावर सरकारचं नियंत्रण नाही, असं म्हणणं योग्य नाही, असा दावा केलाय वैद्यकीय शिक्षण संचालकांनी.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहणारं सरकार यातून स्वतःची पळवाट काढतंय. पण, शिक्षणाच्या नावाखाली जे सर्वसामान्य पालक पिचले जातायेत, त्याचा मात्र कुठेही विचार होताना दिसत नाही. याकडं सरकार कधी गांभीर्यानं बघणार हे पाहावं लागेल.

 

First published: May 11, 2017, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading