पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या

निगडी परिसरातील पूर्णानगर भागात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. वेदांत भोसले असं विद्यार्थ्यांचं नाव आहे.

  • Share this:

13 मार्च : पिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा गळा चिरून खून करण्यात आलाची धक्कादायक उघडकीस आली आहे. निगडी परिसरातील पूर्णानगर भागात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. वेदांत भोसले असं विद्यार्थ्यांचं नाव आहे.

वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता. मैत्रिणीसोबत अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडवण्यासाठी गेला. तेव्हा परत घरी येत असताना त्याच्या वर काही अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार केले त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र हल्लेखोर कोण होते आणि ही हत्या का करण्यात आली या बाबत अजून स्पष्ट झालं नाही. वेदांत हा उच्चभ्रू कुटुंबातील मुलगा होता. निगडी पोलीस या  प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading