Home /News /maharashtra /

एका अधीक्षकाने झुकवली NCB ची शरमेनं मान, पोलिसांनी केली अटक, बीडमधील घटना

एका अधीक्षकाने झुकवली NCB ची शरमेनं मान, पोलिसांनी केली अटक, बीडमधील घटना

विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला...

विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला...

विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला...

बीड, 09 ऑक्टोबर : एकीकडे शाहरुख खानच्या (sharukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan) अटक प्रकरणामुळे अंमली विरोधी पथक अर्थात NCB वर  एकापाठोपाठ गंभीर आरोप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे एका NCB च्या अधिकाऱ्याने धावत्या रेल्वेत एका विद्यार्थिनीची छेड आणि विनयभंग (molesting case ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीडमध्ये (beed) या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. हैदराबाद -हडपसर रेल्वे गाडीमध्ये रात्री विद्यार्थिनीचा छेड काढत विनयभंग केल्याची घटना उदगीर -लातूर दरम्यान घडली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून  मुंबई येथील एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण (NCB Superintendent Dinesh Chavan arrested) या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला परळी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे. प्रियांका गांधींना अध्यक्ष करा, काँग्रेस नेत्याच्या मागणीने खळबळ गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीचे अधीक्षक दिनेश चव्हाण हे रेल्वेनं प्रवास करत होते. त्यावेळी  प्रवास करत असलेल्या एका विद्यार्थिनीची प्रवासादरम्यान छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाणला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एका एनसीबीच्या अधिकाऱ्याला छेड काढण्याच्या प्रकरणात अटक झाल्यामुळे एनसीबीच्या पथकात खळबळ उडाली आहे. आर्यन खान अटक प्रकरणात NCB वर गंभीर आरोप दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी (Nawab Malik) एनसीबीवर गंभीर आरोप केले. क्रुझवर झालेल्या कारवाईत एनसीबीनं 8 लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं 11 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे. रिषभ सचदेवा, हे भाजप युवा मोर्चाचे मोहित भारती यांचा मेहुणा आहे.

एका Commentमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्याची हत्या; कॉलेज परिसरातच घातली गोळी

रिषभ सचदेवा हे राष्ट्रपतींना पण भेटले आहेत, आणि राष्ट्रपती यांनी पुरस्कृत केलं आहे. रिषभ सचदेवा यांना 2 तासांत सोडण्यात आलं. जेव्हा सुनावणी सुरू होती तेव्हा यांचं नाव घेण्यात आलं होतं. यांच्याच बोलण्यावरून आर्यन आला होता, असा खुलासाही मलिकांनी केला.  या 3 लोकांना सोडण्याचे आदेश कुणी दिले हे ncb ला सांगावं लागेल, असा सवाल मलिकांनी एनसीबीला विचारला. त्यानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडे ड्रग्स सापडले नाही म्हणून सोडण्यात आलं असं सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai, NCB

पुढील बातम्या