• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • BREAKING: ज्याची भीती होती तेच झालं, परभणीच्या शाळेत विद्यार्थ्याला कोरोनाची लागण

BREAKING: ज्याची भीती होती तेच झालं, परभणीच्या शाळेत विद्यार्थ्याला कोरोनाची लागण

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुढील आठ दिवस शाळा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

 • Share this:
  परभणी, 08 ॲाक्टोबर : कोरोनामुळे (corona) बंद पडलेल्या शाळांचे (school) दार मोठी खबरदारी घेत उघडण्यात आले. पण ज्याची भीती होती तिच घटना परभणीमध्ये घडली आहे. परभणीतील (parbhani) एका शाळेमधील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण (student corona positive) झाली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शाळा आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु, शाळेमधील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार परभणी जिल्ह्यात घडला आहे. पूर्णा तालुक्यातील श्री सोमेश्वर माध्यमिक विद्यालय, गौर येथील सातवी वर्गात शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थ्याला, कोरोणाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, प्रशासनाने पुढील आठ दिवस शाळा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाने, विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी केली असून, विद्यार्थी वगळता घरातील सर्व व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या शाळा आणि शाळा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
  Published by:sachin Salve
  First published: