विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक

केवळ आधारकार्ड विसरला म्हणून शिक्षिकेने मुलाला घरी पाठवलं होतं त्यामुळे शिक्षिकेला पोलिसांनी अटक केलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 09:01 PM IST

विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू, मुलाला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला अटक

नाशिक 1 ऑगस्ट : नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलीय. शिक्षिकेने शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या विद्यार्थ्याला आधारकार्ड आणायला घरी पाठवलं. तो चिमुकला घरी निघाला असताना बांधकाम सुरू असलेल्या एका खोल खड्ड्यात पडला. त्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. नाकातोंडात पाणी गेल्याने त्या मुलाचा करुण अंत झाला. केवळ आधारकार्ड विसरला म्हणून त्याला घरी पाठविणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केलीय.

नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संत कबीर नगर येथे अक्षय साठे ह्या 7 वर्षीय शाळकरी मुलाला शाळेतून शिक्षिकेने कागदपत्र आणण्यासाठी सांगितलं. त्यामुळे शाळा सुरू असतानाही अक्षय हा शाळेतून घरी आधारकार्ड घेण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान अक्षय संत कबीर नगर येथे एका खाजगी बांधकाम सुरू असलेल्या जागेतून जात असताना एका खड्यात पडला.

त्या खड्यात पावसाचे पाणी साठलेले होते. त्यात अक्षयचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी महानगरपालिकेच्या शिक्षिका मंदा बागुल आणि बांधकाम करून घेणाऱ्या संगीत वाघमारे यांच्या विरोधात अक्षय साठेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तर शिक्षिकेला अटक केलीय. अक्षयच्या पालकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

VIDEO : 'मातोश्री'वरून 25 वेळा फोन आले, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

साताऱ्यातील पाटण येथील नदी पात्रात आई आणि मुलगी वाहून गेल्या. वाहून गेलेल्या मायलोकींपैकी आईचा मृतदेह सापडला असून यातील लहान मुलीचा मृतदेह आद्याप सापडला नाही. हौसाबाई शिर्के आणि कोमल या दोघी मायलेकी गुरे चरुन काल सायंकाळी घरी येत असताना या दोघीही पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीपात्रात वाहून गेल्या. आज दिवसभर ट्रेकर्सनी या नदीपात्राचा परिसर शोधून काढला. महिलेचा मृतदेह मिळाला असून कोमलचा मृतदेह आद्याप मिळालेला नाही.

Loading...

या नदीपात्राचे पाच किलोमिटर नंतर धबधब्यात रुपांतर होत असल्यामुळे मुलीचा मृतदेह आता धबधब्याच्या खालच्या बाजूला  शोधण्याशिवाय पर्याय नसल्याच मत ट्रेकर्सनी व्यक्त केल असून अंधार पडल्यानंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलंय. आता शुक्रवारी  सकाळी पुन्हा ही ट्रेकर्समंडळी ही शोध मोहिम सुरु ठेवणार आहेत.

उपाशी मरण्यापेक्षा आत्मदहनाची परवानगी द्या, पैसे थकल्याने शेतकऱ्यांचा संताप

कार नदीत कोसळली

मावळ  : मावळ तालुक्यातील टाकवे गावात इंद्रायणी नदी पुलावरून जात असताना एक स्विफ्ट कार पुलाचा कठडा तोडून नदीत पडली. कार मधील एकाने पोहोत किनारा गाठत आपला जीव वाचवला तर दोघे जण कारमध्येच अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे सध्या इंद्रायणी नदीला भरपूर पाणी आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार नेमकी कुठे आहे याचा पोलीस शोध घेताहेत.

औरंगाबादेत वर्गमित्राचा तरुणीवर बलात्कार.. म्हणाला, अश्लील फोटो FB वर व्हायरल कर

निळ्या रंगाची स्विफ्ट कार कान्हे ते टाकवे रोडवर  इंद्रायणी नदीच्या पुलावरुन खाली नदी पात्रात पडली. भरधाव वेगाने ही कार येत होती. कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कार नदीपात्रात कोसळली.

या कारमध्ये अक्षय संजय ढगे (20), संकेत नंदु असवले (20),  अक्षय मनोहर जगताप (20), असे तिघेजण होते. संकेत हा कार चालवत होता. यातल्या अक्षय हा कारमधून बाहेर पडला आणि पोहत किनाऱ्यावर आला. अजून दोन जण कारमध्ये अडकल्याची माहिती वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलीय. पोलिसांना मदतकार्यात शिवदुर्ग पथकही सहकार्य करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...