Home /News /maharashtra /

धक्कादायक! वर्गातच सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह, खूनाचा संशय

धक्कादायक! वर्गातच सापडला विद्यार्थिनीचा मृतदेह, खूनाचा संशय

पॉलिटेक्निक इमारतीच्या वर्गात काही जणांना संबंधित विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

    सांगली, 9 डिसेंबर : शांतिनिकेतन मुक्त विद्यापीठाच्या इमारतीत विद्यार्थिनीचा मृतदेह मृतदेह सापडला आहे. ही विद्यार्थिनी मुक्त विद्यापीठाच्या (SY दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली. पॉलिटेक्निक इमारतीच्या वर्गात काही जणांना संबंधित विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मृत विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याप्रकरणी खुनाचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून विद्यापीठात चौकशी करण्यात येत आहे. मृत विद्यार्थिनीचे अजूनही या नाव समोर आलेले नाही. पण थेट विद्यापीठातच विद्यार्थिनी मृतदेह आढळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या मुलीने नक्की आत्महत्या केली की कोणत्यातरी वादातून तिची हत्या करण्यात आली, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, एखाद्या विद्यार्थिनीचा वर्गात मृत्यू होणे, ही गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात विद्यापीठ प्रशासन मात्र अडचणीत सापडले आहे. ट्रॅकरला बांधून तरुणाला काठी तुटेपर्यंत मारलं, VIDEO आला समोर
    First published:

    Tags: Death, Sangali, Student, University

    पुढील बातम्या