सोशल मीडियाच्या गैर वापरामुळे विद्यार्थिनीचा गेला जीव, मित्राला खावी लागली जेलची हवा!

सोशल मीडियाच्या गैर वापरामुळे विद्यार्थिनीचा गेला जीव, मित्राला खावी लागली जेलची हवा!

सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्यामुळे एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना वाशिममध्ये घडली होती

  • Share this:

किशोर गोमाशे,प्रतिनिधी

वाशिम, 07 डिसेंबर : सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाल्यामुळे एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना वाशिममध्ये घडली होती. या प्रकरणी  तिच्या अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली आहे.

मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला नोट्स च्या मागणी करिता विद्यार्थी प्रतीक दिनकर डोंगरे याने वॉशरूम मध्ये बोलावले. त्यावेळी दिपक महादेवराव वानखडे नामक युवकाने दोघांची चर्चा सुरू असताना व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि  इतर लोकांच्या मोबाईलवर पाठवला. हाच व्हिडिओ त्याने  शाळेतील शिक्षक अरुण चव्हाण यांच्या मोबाईलवरही पाठवला. त्यानंतर त्या शिक्षकाने इतर लोकांच्या मोबाईलवर ती क्लिप पुढे पाठविली. या क्लिपमुळे आपली समाजात बदनामी होईल या भीतीने या विद्यार्थिनीने खरबी (पिंप्री) गांवी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

घटनेची फिर्याद मृतक मुलीच्या वडिलांनी मंगरुळपिर पोलीस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून 4 जणांना अटक केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियाच्या गैर वापरामुळे एका शालेय विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिच्या वर्ग मित्राला जेलची हवा खावी लागली. केवळ एकमेकांशी बोलतांनाची व्हिडिओ क्लिप जर सोशल मिडियाद्वारे व्हायरल झाली नसती. तर त्या विद्यार्थिनीचे प्राण वाचले असते. त्यामुळे सोशल मीडियाचा सर्वांनी काळजीपूर्वक वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या