Home /News /maharashtra /

ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, पण...पार्सल उघडून पाहाताच मुलानं केली आत्महत्या

ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला मोबाईल, पण...पार्सल उघडून पाहाताच मुलानं केली आत्महत्या

ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यानं नैराश्यातून रोहितनं आत्महत्या केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

हैदर शेख (प्रतिनिधी), चंद्रपूर, 9 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी परिसरातील पूयारदंड येथील रोहित राजेंद्र जांभुळे (वय-18) या विद्यार्थ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यानं नैराश्यातून रोहितनं आत्महत्या केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. हेही वाचा...'मराठी'साठी लेखिकेचा मुंबईत ठिय्या, राज ठाकरेंनी केलं मनसैनिकांच कौतुक! मिळालेली माहिती अशी की, रोहित यानं काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल मागवला होता. मोबाईलची मूळ किंमत 15 हजार रुपये होती. रोहित यानं 10 हजार रुपये संबंधित कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते. उर्वरित 5 हजार रुपये पार्सल आल्यानंतर पोस्टऑफिसमध्ये भरायचे होते. रोहितला पोस्ट ऑफिसमधून त्याचं पार्सल आल्याचा फोन आला. मात्र, रोहितकडे पार्सल सोडवण्यासाठी उर्वरित 5 हजार रुपये नव्हते. त्यानं आईकडे पैशाची मागणी केली. आईनं पैशाची जुळवाजुळव करून मुलासोबत पोस्टामध्ये पार्सल सोडवायला गेली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीनं पाठवलेलं पार्सल आईनं व मुलाने उघडलं. मात्र, बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी रिकामी पाकिट, 1 बेल्ट व खरड्याचा तुकडा अशा वस्तू निघाल्या. आपली मोबाईल कंपनीकडून फसवणूक झाल्याचं रोहितच्या लक्षात आलं. त्यानं संबंधित कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा संपर्क झाला नाही. त्यामुळे रोहित नाराज झाला होता. रोहितची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यानं 15 हजार रुपयांचा भुर्दंड बसल्यानं आई-वडील नाराज झाले. ऑनलाईन फसवणूक झाल्यानं रोहितही हताश झाला होता. आर्थिक फसवणुकीचा धक्का त्याला सहन झाला नाही. रोहित गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होता. आई-वडिलांनी नातेवाईक, मित्र मंडळींकडे त्याची विचारपूस केली. मात्र, रोहित कुठेही सापडला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी गावातील शेतकरी व महिला शेतात जात असताना त्यांना रोहितची गाडी- कपडे विहिरीजवळ दिसले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. रोहीतने कमरेला दगडाने भरलेली पोतडी बांधून विहिरीत उडी घेत आपला जीव संपवला. या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा...कोयत्यानं कापलं आधी स्वतःचं गुप्तांग नंतर गळा चिरून तरुणानं केली आत्महत्या संबंधित मोबाईल कंपनीचा शोध घेऊन तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी रोहितच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, बारावीत शिकत असलेल्या रोहितने ऑनलाईन शिक्षणासाठी हा मोबाईल विकत घेण्याचा हट्ट केला होता, असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. या घटनेने ग्रामीण भागातही ऑनलाईन शिक्षणाचा आर्थिक भुर्दंड व त्याचे विपरीत परिणाम दिसून येत आहेत. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Chandrapur, Crime, Cyber crime

पुढील बातम्या