नवी दिल्ली, 21 जानेवारी : UPSC च्या प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने एका विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रोसमोर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या प्रकारात मेट्रो चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. यामुळे त्या विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे. हा प्रकार झाल्यानंतर विद्यार्थ्याला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
UPSC ची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रोच्या ब्लू लाइन मार्गावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मेट्रो ट्रेनच्या सेवेचा खोळंबा झाला. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेट्रो ट्रेनसमोर उडी घेणारा विद्यार्थी हा BTec असून कोचिंग सेंटरच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. 2019 या वर्षात स्पर्धा परीक्षेच्या सुरुवातीला दिलेल्या परीक्षेत त्याला अपयश आले होते. त्याचे वडील तेलंगणात शिक्षक असून आई गृहिणी आहे.
त्या विद्यार्थ्य़ाचे समुपदेश
UPSC परीक्षांमध्ये अपयश आल्याने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 23 वर्षे आहे. मेट्रोसमोर उडी घेतल्यानंतर मेट्रो चालकाने प्रसंगावधान राखीत गाडी थांबवली. यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. दरवर्षी देशभरातून लाखो तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होता. यापैकी प्रत्येक यश मिळत नाही. मात्र म्हणून खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवणे आवश्यक आहे. यासाठी समुपदेशनाची मदत होऊ शकते. त्यामुळे अभ्यासाच्या दडपणाखाली न राहता प्रयत्न सुरू ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attempt suicide, Failed students, Upsc exam