फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही

फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले नाही

शिक्षणाचा बाजार मांडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेय

  • Share this:

सोलापूर, ११ सप्टेंबर- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातल्या सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूलमधील पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला फी न भरल्यानं परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार पालकांनी केलीय. याप्रकरणी पालकांनी बार्शीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केलीय. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारत कारवाईचे आदेश दिलेत.

शिक्षणाचा बाजार मांडल्याचे उदाहरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेय. बार्शी शहरातील सेंट जोसेफ कॉन्व्हेट हायस्कूल मध्ये पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शाळेची फी न भरल्याने परिक्षेला बसू दिले नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आज मंगळवारी परीक्षा होती. मात्र तिच्या पालकांनी फी न भरल्याने तिला परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला.

त्यामुळे संतापलेल्या पालकांनी थेट मुख्यध्यापकाकडे धाव घेतली मात्र तरीही विद्यार्थिनीला परीक्षेला बसू दिले गेले नाही. अखेर संतापलेल्या पालकांनी थेट बार्शीचे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे धाव घेत आपली तक्रार मांडली. त्यानंतर गट शिक्षाणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना याचा जाब विचारत कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान परिक्षेला बसू न दिल्याने आमच्या पाल्याच्या झालेल्या मानसिक खच्चीकरणाला शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापक जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे. या सर्व प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!

First published: September 11, 2018, 8:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading