• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं होणार स्ट्रक्चरल आॅडिट

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं होणार स्ट्रक्चरल आॅडिट

मंदिराचं आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक ते बदल आणि दुरुस्त्या केल्या जाणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिलीय.

  • Share this:
पंढरपूर, 15 सप्टेंबर : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतलाय. मंदिराचं आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक ते बदल आणि दुरुस्त्या केल्या जाणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिलीय. सुमारे बाराव्या शतकामध्ये बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये वर्षाकाठी एक ते दीड कोटी भाविक दर्शनासाठी येतात.या पुरातन मंदिरात गेल्या काही वर्षात पडझड झाल्यानं काही दुर्घटना घडल्या होत्या. विठ्ठलाच्या मूळ मंदिरावर बोजा टाकणारी काही बांधकामं झाल्यानं मूळ वास्तू खचू लागल्याचं समोर आलं होतं.त्यानंतर पाडसाळीचा संपूर्ण सिमेंटचा मंडप काढून टाकण्यात आला होता. काही ठिकाणी वास्तूमध्ये डागडुजी आणि दुरुस्त्या करणं गरजेचे बनल्यानं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला गेलाय.
First published: