साईबाबांच्या मंदिरात भगवे फलक ओम आणि त्रिशूळ

मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरातील जुने निळ्या, काळ्या रंगांचे फलक काढले. त्यानंतर त्यांच्या जागी भगव्या रंगात फलक लावण्यात आले. भगव्या रंगाचा वापर संस्थानमध्ये वाढला आहे.

मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरातील जुने निळ्या, काळ्या रंगांचे फलक काढले. त्यानंतर त्यांच्या जागी भगव्या रंगात फलक लावण्यात आले. भगव्या रंगाचा वापर संस्थानमध्ये वाढला आहे.

  • Share this:
शिर्डी,01 ऑक्टोबर: सर्वधर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरात सर्वत्र भगवे फलक बसवले आहेत. तर नव्याने उभारलेल्या शताब्दीच्या ध्वजस्तंभावरही ओम आणि त्रिशूळ बसवला आहे. ही प्रतीकं पारंपरिक पद्धतीने वापरली आहेत, असं संस्थानचं म्हणणं आहे. साईबाबांच्या समाधीला यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. साईबाबा सर्वधर्मसमभावाची शिकवण द्यायचे. 'सबका मालिक एक 'असा संदेश त्यांनी दिला. साईबाबांच्या समाधीवर हिंदू-मुस्लीम एकत्र चादर चढवतात. शीख, ख्रिश्चन असे सर्व धर्मांचे भक्त शिर्डीत हजेरी लावतात. साईबाबांचे हे सर्वधर्मनिरपेक्ष रूप आणि त्यांचं तत्त्वज्ञान शिर्डी संस्थानात आजपर्यंत जपतं आहे. साईबाबांचा जात-धर्म कोणता हेही अज्ञात आहे. साईबाबांनी ते कधी सांगितले नाही. संस्थानने प्रकाशित केलेल्या साईबाबंच्या चरित्रात साईबाबांच्या जातीचा धर्माचा उल्लेखही केलेला नाही. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिर परिसरातील जुने निळ्या, काळ्या रंगांचे फलक काढले. त्यानंतर त्यांच्या जागी भगव्या रंगात फलक लावण्यात आले. भगव्या रंगाचा वापर संस्थानमध्ये वाढला आहे. मंदिराने शेगाव संस्थानच्या धर्तीवर सेवेकरी योजना सुरू केली आहे. शेगावच्या सेवेकऱ्यांचा गणवेश पांढरा आहे. शिर्डी संस्थानने मात्र सेवेकरी योजनेचे अनुकरण करताना सेवेकऱ्यांचा सदरा भगवा केला आहे. शताब्दीच्या ध्वजस्तंभावर ओम, त्रिशूळ ही धार्मिक प्रतीके वापरण्यात आली आहेत.
First published: