अहमदनगर, 12 फेब्रुवारी : बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातील सरपंचाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी जबरदस्त धक्का दिला आहे. लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैरे यांनी थोरातांना रामराम ठोकला असून ते आज भाजपच्या गोट्यात सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. त्यात हे सरपंच थोरातांच्या गावचे असल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच रविंद्र खैर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. थोरात समर्थन रविंद्र खैरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा हात धरला आहे.
दरम्यान राज्याच्या राजकारणात नाना पटोले यांच्या प्रवेशांनंतर मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचे वेगळे मत आणि माझे मत वेगळे. मला ईव्हीएम नको मी तसं मत व्यक्त केले. अजित पवार वित्त मंत्री आहेत. चावी त्यांच्याकडे म्हणून सर्वच ऐकायचं असं कुठे आहे? असं म्हणतं नाना पटोले यांची अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज्यपाल यांना बसवलेच नाही तर मग राज्यपाल यांना उतरवण्याचा मुद्दा येतो कुठे? गर्विष्ठपणाची भाषा भाजपला जास्त लागू होते. भाजपा ही राज्यपालांच्या मुद्दावर बोलते. पण राज्यातील महागाईवर भाजपा बोलत मुद्दाम बोलत नाही. तर असे मुद्दे काढून लक्ष विचलित करण्याचे काम राज्यातील विरोधी पक्ष नेते करीत आहेत.