Home /News /maharashtra /

मोठी बातमी: पॉझिटिव्हिटी रेट वाढला; साताऱ्यात आता कडकडीत Lockdown, पाहा नवे नियम

मोठी बातमी: पॉझिटिव्हिटी रेट वाढला; साताऱ्यात आता कडकडीत Lockdown, पाहा नवे नियम

साताऱ्यातील कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली असून शनिवारपासून पूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सातारा, 2 जुलै : साताऱ्यातील कोरोना रुग्णांची (Covid Patients) संख्या अचानक वाढली असून शनिवारपासून (Saturday) पूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) दिले आहेत. साताऱ्यातील कोरोना पॉझिटीव्हिटी रेट (Positivity rate) वाढून जिल्ह्याच्या चौथ्या स्तरात समावेश झाला आहे. ही धोक्याची घंटा असून तातडीने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. साताऱा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 789 नवे रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4666 जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर 7774 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या सातारा जिल्ह्यात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या पश्चिम महाराष्ट्रीत तीन जिल्ह्यांमध्ये सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र दुसऱ्या लाटेदरम्यान दिसून येत होतं. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येनं नवनवे उच्चांक प्रस्थापित केले होते. त्यानंतर हा आकडा काहीसा उतरणीला लागल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा ही संख्या वाढू लागली आहे. हे वाचा -स्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका लागू होणार चौथ्या टप्प्याचे नियम साताऱ्यात आता चौथ्या टप्प्याचे नियम लागू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत दुकानं सकाळी 9 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून ही माहिती दिली आहे. साताऱा जिल्हा हा सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. त्यामुळे दोन्हीकडून मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकणी येत असतात. साताऱ्यात महाबळेश्वर, पाचगणी, वाई यासारखी पर्यटनस्थळं असल्यामुळं तिथंदेखील विकएंडला नागरिक गर्दी करत असल्याचं चित्र होतं. आता लॉकडाऊनमुळे या सगळ्याला खिळ बसणार आहे.
Published by:desk news
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Satara

पुढील बातम्या