मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी : आज मध्यरात्रीपासून पुण्यात कडक लॉकडाऊन; केवळ या सेवा राहतील सुरू

मोठी बातमी : आज मध्यरात्रीपासून पुण्यात कडक लॉकडाऊन; केवळ या सेवा राहतील सुरू

कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 12 जुलै : मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोनाचा रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारी रुग्णसंख्या पाहता या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केला असून यंदा नियम अधिक कडक करण्यात आले आहे. त्यातच पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. पहिले पाच दिवस फक्त दूध घरपोचसेवा आणि मेडिकल्स वगळता सर्व सेवा बंद राहतील. 19 जुलैपासून भाजीपाला आणि दुकाने सकाळी 8 ते 12 या वेळेत सुरू राहणार आहेत. पुणे मनपाचे नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत. 14 जुलै ते 23 जुलै असा हा लॉकडाऊन असणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातल्या त्यात मुंबई, पुणे येथे कोरोनाचा जास्त प्रभाव झालेला आहे. यामुळे शासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक डॉ.रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनमधील नियम 1. शासनाने घेतलेल्या या लॉकडाऊन कालावधीत प्रत्येकाने हात स्वच्छ धुऊन मास्कचा वापर करावा. 2. लॉकडाऊन मोडणार नाही याची काळजी घ्यावी. 3. घरातील कुठल्याही व्यक्तीला ताप व श्वसनाचा त्रास झाला तर पुढे येऊन तपासणी केली पाहिजे. प्रत्येक डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी हे आपल्यासाठी सेवा देत आहेत. यासाठी प्रत्येकाने साथ देवून पुढाकार घेऊन स्वत:ला 'कोरोना योध्दे' समजून हा लॉकडाऊन यशस्वी करावा, असं आवाहन उपसंचालक डॉ.गंगाखेडकर यांनी केले. दरम्यान, पुणे शहरात तर कडक लॉकडाऊन असेल, तर जिल्ह्यातील संक्रमण असलेल्या भागातही लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता पुन्हा एकदा शिस्त दाखवत अत्यावश्यक काम नसेल तर घरातच थांबावं लागणार आहे. अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल.
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या