पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; पालिकेचं दुर्लक्ष

पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; पालिकेचं दुर्लक्ष

रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाही केवळ दप्तर दिरंगाईमुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठीच कंत्राट प्रलंबित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 02नोव्हेंबर: पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक सध्या भटक्या कुत्र्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाही केवळ दप्तर दिरंगाईमुळे या कुत्र्यांना पकडण्यासाठीच कंत्राट प्रलंबित राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या दीड महिन्यापासून हे कंत्राट न दिल्याने शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर तर वाढलाच त्याचबरोबर या कुत्र्यांकडून दररोज सरासरी 3 व्यक्तींवर हल्ला केल्या गेल्याचीही माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश गोरे यांना विचारला असता, कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या दरम्यान होणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्यांसाठी जबाबदार कोण , असा प्रश्न उपस्थित करत या शहरातील नागरिक जीव मुठित धरून प्रवास करत आहेत.

आता हे कंंत्राट कधी पास होतं आणि  या कुत्र्यांच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 2, 2017, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading