Home /News /maharashtra /

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाचे तोडले लचके, LIVE VIDEO

दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, पायाचे तोडले लचके, LIVE VIDEO

सोनी यांच्या पायात कुत्र्याचे दात खोलवर रुतल्याने त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उल्हासनगर, 12 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये (ullhasnagar) एका भटक्या कुत्र्याने (dog attack) महिलेवर हल्ला करत पायाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅम्प पाचच्या गांधीरोड परिसरात सकाळच्या सुमारास ही महिला दुचाकी वरून कामाला जात असतांना हा प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv video) कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  सोनी देशमुख असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनी या रविवारी सकाळी दुचाकीवरून कामावर जात होत्या. त्याच वेळी अचानक रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करत त्याच्या पायाला अनेक ठिकाणी चावा घेत लचके तोडले. कुत्र्याने अक्षरश: त्यांच्या पायाला जोरात चावा घेतला. त्यावेळी त्यांनी पाय सोडवण्यासाठी जोरदार झटका मारला. पण, कुत्र्याने पुन्हा त्यांना चावा घेतला. त्यामुळे तोल जाऊन त्या गाडीसह खाली कोसळल्या. तिथे उपस्थितीत असलेल्या काही स्थानिकांनी दगड उगारला असता भटक्या कुत्र्याने पळ काढला. ऑफिसमध्ये काम करताना अचानक खिशात OnePlus Nord 2 चा झाला स्फोट, कंपनी म्हणते यात सोनी यांच्या पायात कुत्र्याचे दात खोलवर रुतल्याने त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. सध्या त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कॅम्प पाच गांधीरोड परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेकदा इथून ये जा करतांना भीती वाटते, त्यामुळे प्रशासनाने वेळीच या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या