खळबळजनक! गणेशोत्सवाच्या धामधुमीत मंडपात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अनोळखी पुरुषाचा मृतदेह संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात बेवारस अवस्थेत होता. सुरुवातील लोकांना तो झोपला असावा असं वाटलं. पण नंतर तो मृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 02:23 PM IST

खळबळजनक! गणेशोत्सवाच्या धामधुमीत मंडपात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

मंगळवेढा, 06 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. असाच एक गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार मंगळवेढ्यामध्ये समोल आला आहे. शहरातील संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात अंदाजे 65 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अनोळखी पुरुषाचा मृतदेह संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात बेवारस अवस्थेत होता. सुरुवातील लोकांना तो झोपला असावा असं वाटलं. पण नंतर तो मृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ऐन गणोशोत्सवात मंडपात असा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटावी यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - राष्ट्रवादीला धक्का, 55 नगरसेवक साथ सोडणार; महापालिकेची सत्ताही जाणार

MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण...

Loading...

रुग्णाचा MRI (Magnetic Resonance Imaging)केल्याचं तुम्ही पाहिलंच असेल पण त्यातून रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 8 वर्षाच्या मुलीचा एमआरआय केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एमआरआय करण्यासाठी गेलेल्या मुलीचा सेंटरमध्येच मृत्यू झाला. त्यामुळे मृत मुलीच्या कुटुंबीयांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

इतर बातम्या - कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला मुलगा, मदतीसाठी धावली आई; पण कोणीही नाही बचावलं!

MRIसाठी घेऊन जाताना मुलीवर ओव्हरडोस दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. लाला लाजपत राय रुग्णालयात खासगीरित्या चालवल्या जाणार्‍या एमआरआय सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीच्या कुटूंबाचा असा आरोप आहे की एमआरआयच्या अति प्रमाणात डोसमुळे तिचा मृत्यू झाला. कानपूरच्या एलएलआर हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरके मौर्य यांनी एमआरआय सेंटरला नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. केंद्राकडून उत्तर मिळाल्यानंतर पुढील कार्यवाई केली जाईल, असं सीएमएसचं म्हणणं आहे.

VIDEO: 'औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं 5 वर्षांत केलं', 'या' निर्णयावर भडकले अमोल कोल्हे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 02:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...