BREAKING: शिवसेनेच्या विजयी मिरवणूकीदरम्यान राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर तुफान दगडफेक

BREAKING: शिवसेनेच्या विजयी मिरवणूकीदरम्यान राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर तुफान दगडफेक

दगडफेकीमध्ये रामचंद्र हुमणे यांच्या घराचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 25 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. असं असताना रत्नागिरीच्या गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाअध्यक्षांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीमध्ये रामचंद्र हुमणे यांच्या घराचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. अज्ञात जमावाकडुन रात्रीची दगडफेक केल्याची तालुकाध्यक्ष रामचंद्र हुमणे यांची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या भास्कर जाधव यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यानची घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. गुहागर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी चुरशीची लढत होती. या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. भास्कर जाधव यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला चांगलाच सुरुंग लागला होता. शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव नवव्या फेरीअंती 8693 मतांनी आघाडीवर होते. गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर अशी अटीतटीची लढत होते. नवव्या फेरीअंती राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांना 22262 मतं मिळाली. एकूणच सध्याचा कल पाहता गुहागर मतदारसंघात शिवसेनेचं पारडं जड आहे.

भास्कर जाधव यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. मात्र काही कलहांमुळे भास्कर जाधवांनी 2019 विधानसभा निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. भास्कर जाधव यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत सेनेचे उमेदवार भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्ररवादीचे सहदेव बेटकर आमने-सामने होते. बेटकर यांना समाजघटकांचे पाठबळ होते. तर भाजपला हा मतदारसंघ न मिळाल्या अंतर्गत नाराजी होती.

VIDEO: बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या आईचा लेक जिंकला आमदारकी, मुलाचा बहुमान पाहून मातेला अश्रू अनावर

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला होता. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

इतर बातम्या - महाराष्ट्राच्या राजकारणातील नवं पर्व, रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंना फोन आणि...

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं.

या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.

इतर बातम्या - भाजपच्या अनेक खासदारांचा दाऊदशी संबंध, राष्ट्रवादी नेत्याचा खळबळजनक आरोप

Published by: Renuka Dhaybar
First published: October 25, 2019, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading