मोदींवर टीका करणं बंद करा, काँग्रेस सांभाळा; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

मोदींवर टीका करणं बंद करा, काँग्रेस सांभाळा; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

राजकारणातील अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तीमत्त्व शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जुलै : काँग्रेससह अधिक काळापर्यंत राजकारणाच्या मैदानात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी सीएनएन न्यूज 18 शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील त्यांचे अनुभव व्यक्त केले. ते म्हणाले, काँग्रेससाठी गांधीवाद एक मजबूत शक्ती आहे. यासह त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही सल्ला दिला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींवर टीका करणं थांबवायला हवं, ही वेळ काँग्रेसचं काम सांभाळायची आहे.

पुढे पवार म्हणाले, मी अनेक वर्षांपासून काँग्रेसला बघत आलो आहे. आणि यातून एक गोष्ट मला दिसून येते. कोणी याचा स्वीकार करेल किंवा नाही..मात्र गांधीवाद काँग्रेससाठी मोठी ताकद आहे.

सोनिया गांधी काँग्रेसला एकत्र आणण्यात यशस्वी राहिल्या. आता काँग्रेसवर विश्वास असणाऱ्यांनी राहुल गांधी यांचा स्विकार केला आहे. मला वाटतं की सर्वांनी पक्षाची पूर्ण जबाबदारी राहुल गांधींवर सोपवायला हवी. ते पुढे म्हणाले राहुल गांधी यांनी पक्षाचं शासन सांभाळणं म्हणत्त्वपूर्ण आहेच.. आणि पक्षाच्या विविध नेत्यांशी चर्चा करणे गरजेचं आहे. ते म्हणाले – सर्व नेत्यांशी बोलायला हवं...त्यांना एकत्र आणायला हवं..

हे वाचा-भाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं, रोहित पवारांचा टोला

ऑफिस कसं सांभाळायला हवं याप्रश्नावर शरद पवार म्हणाले, त्यांना देशाचा दौरा सुरू करायला हवा. त्यांनी प्रवास करावा..त्यानंतर पवारांना मोदींविरुद्ध गांधींच्या ट्विटविषयी विचारलं...राहुल गांधींनी ट्विट केलं होतं की –पीएम आपली प्रतीमा तयार करण्यासाठी 100 टक्के लक्ष केंद्रीत करीत आहेत. भारतातील सर्व नियंत्रित संस्थानं या कामात व्यस्त आहेत. यावर शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला..ते म्हणाले – हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. मात्र आपण पाहिलं आहे की जेव्हा तुम्ही कोणा एका व्यक्तीला वैयक्तिक लक्ष्य करता तेव्हा आपली विश्वासार्हता कमी होत जाते. हे टाळायला हवं...

Published by: Meenal Gangurde
First published: July 29, 2020, 3:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading