मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संपकरी उठले प्रवाशांच्या जीवावर? धावत्या एसटी बसवर दगडफेक, बस झाडावर आदळली

संपकरी उठले प्रवाशांच्या जीवावर? धावत्या एसटी बसवर दगडफेक, बस झाडावर आदळली

ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे.

ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे.

ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे.

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 14 जानेवारी : एसटी महामंडळ (ST Corporation) राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाऱ्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी (st bus workers) संपावर ठाम आहे. तर काही कर्मचारी हे कामावर परतले आहे. बुलडाण्यात एसटी बस सुरू झाल्या आहे. पण, काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर आदळली. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान विलीनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचारी संघटनात फूट पडली आहे. अशातच ज्या काही अल्प प्रमाणात परत चालू असलेल्या बस फेऱ्या आहेत त्यावर अशा दगडफेक होत असल्याचा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे कामावर परत आलेल्या चालक वाहक व प्रवाशांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे.

(तीन वयोवृद्ध महिलांचा घरातील वेगवेगळ्या खोलीत मृतदेह, अंगावर Acid आणि पाणी)

जिल्ह्यातील शेगाव आगाराच्या एसटी बसवर आज जळगाव जामोदवरून शेगावकडे येत असतांना बस वर दगडफेक करण्यात आली. चालकाच्या दिशेने भिरकावलेल्या दगडामुळे चालकाने बचावासाठी हालचाल केल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली.

(ठाकरे सरकारला खोटे ठरवण्याचा डाव, मोदी सरकारने 'त्या' बातम्या ठरवल्या खोट्या!)

या दगडफेकीत एसटी बसचे समोरील काच फुटल्याची घटना घडली. चालकाच्या दिशेने भिरकावलेल्या दगडामुळे चालकाने बचावासाठी हालचाल केली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात चालकासह प्रवाशी जखमी झाले नाहीत. चालकाने वेळीच नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर एसटी प्रशासनाकडून या प्रकरणी तामगाव पोलीसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला आहे.

First published:
top videos