मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ST Bus Strike : एसटी बस संपाला गालबोट, पोलिसांच्या संरक्षणात निघालेली बस फोडली

ST Bus Strike : एसटी बस संपाला गालबोट, पोलिसांच्या संरक्षणात निघालेली बस फोडली

धुळ्यात आज दुपारी एसटी बस आगारातून पहिली बस सोडण्यात आली होती. तब्बल 14 दिवसानंतर एसटी बस आगाराच्या बाहेर पडली होती.

धुळ्यात आज दुपारी एसटी बस आगारातून पहिली बस सोडण्यात आली होती. तब्बल 14 दिवसानंतर एसटी बस आगाराच्या बाहेर पडली होती.

धुळ्यात आज दुपारी एसटी बस आगारातून पहिली बस सोडण्यात आली होती. तब्बल 14 दिवसानंतर एसटी बस आगाराच्या बाहेर पडली होती.

धुळे, 21 नोव्हेंबर : ST महामंडळ राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus strike )  सुरूच आहे. धुळ्यात (dhule) आज पोलिसांच्या संरक्षणात एसटी बस सुरू करण्यात आली. पण आंदोलकांनी बसेसवर दगडफेक केली. त्यामुळे एसटी बसेस पुन्हा आगारात उभ्या करण्यात आले आहे.

धुळ्यात आज दुपारी एसटी बस आगारातून पहिली बस सोडण्यात आली होती. तब्बल 14 दिवसानंतर एसटी बस आगाराच्या बाहेर पडली होती. धुळे बस आगार प्रशासनाने बस स्थानकाबाहेर बस सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी  बस स्थानकावर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तातच धुळे नरडाणा एस टी बस निघाली होती.

एअर इंडिया विकली त्यावर बोलायला तयार नाही, अजितदादांना ST संपावरून भाजपला टोला

यावळी उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली. तर बस स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी बस अडविण्याचा प्रयत्न केला. मनसे कार्यकर्ते व आगार प्रशासनात खडाजंगी झाली.  बस सोडण्याचे लेखी आदेश दाखण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी केली होती. आदेश दाखवल्या शिवाय बस बाहेर पडू देणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली होती. पण, बस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ऑस्ट्रेलियन खेळाडूमुळे रोहित बेस्ट कॅप्टन!, पाहा Inside Story

काही अंतर दूर गेल्यानंतर अज्ञात लोकांनी 4 बसेसवर दगडफेक केली. पोलीस बंदोबस्त दिल्या नंतरही दगडफेक झाली.  पोलिसात या प्रकरणी अद्याप तक्रार दाखल नाही. खबरदारी म्हणून प्रशासनाने बस आगारात परत आणल्या. या दगडफेकीत एका चालकाला दुखापत झाली आहे.

First published:
top videos