Home /News /maharashtra /

साताऱ्याहुन सोलापूरकडे जाताना खबरदारी घ्या, पिलीव घाटात घडली भीषण घटना

साताऱ्याहुन सोलापूरकडे जाताना खबरदारी घ्या, पिलीव घाटात घडली भीषण घटना

सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात हा प्रकार घडला.

सातारा, 20 जानेवारी : रात्रीच्या अंधाराचा आणि घाटातून उतार असल्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींकडून सातारा-पंढरपूर (Satara-Pandharpur road ) रस्त्यावर पिलीव घाटात वाहनांवर तुफान दगडफेक होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री  4 ते 5 वाहनांवर तुफान दगडफेक (Stone pelting )झाल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात हा प्रकार घडला. घाटातून वाहनं उतारावरून येत असताना  चोरट्यांनी  एसटीबस व मोटारसायकलसह 5 वाहनांवर जोरदार दगडफेक केली. यात अनेक वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोठी बातमी, मराठा आरक्षणावर आजच होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे. झाडाच्या आड बसून 7 ते 8 चोरट्यांनी ही दगडफेक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे. 19 तारखेला बस क्रमांक एम. एच. 06 एस.8971 कोरेगाव आगार सातारा विभाग सातारा ते सोलापूर धावणारी बस सातारा येथून चालक जीवराज सुभाष कदम आणि  वाहक अमोल सिध्दनाथ जाधव सोलापूरकडे चालले होते. म्हसवड पिलीव दरम्यान असणाऱ्या घाटात बस आली असता 7-8 व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. सदर बसची पुढील काच फुटून चालकास किरकोळ जखम झाली आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नव्हते. चालकाने बस न थांबविता तशीच पुढे पिलीव येथे घेवून गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. कोणत्याही प्रकारे लुटमार झालेली नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने लाँच आणली DakPayची सुविधा, आता घरबसल्या करा ही कामं या घटनेनं पोलिसांनी संपूर्ण परिसरात जोरदार कोंबिग ऑपरेशन हाती घेतले आहे. लवकरच हल्लेखोरांना अटक करण्यात येईल, असा विश्वास साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Satara news, Solapur, एसटी बस, दगडफेक, पोलीस

पुढील बातम्या