• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने राडा; दोन गटांची एकमेकांवर दगडफेक, VIDEO VIRAL

कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने राडा; दोन गटांची एकमेकांवर दगडफेक, VIDEO VIRAL

Beed video viral: बिड जिल्ह्यातील व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

  • Share this:
बीड, 29 जून: एका कुत्र्याच्या अंगावरून गाडी गेल्याने दोन गटांत जोरदार वाद (clash between two groups) झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांत केवळ वादच झाला नाही तर चक्क दगडफेक (stone pelting) आणि हाणामारी सुद्धा झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील असून याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Video viral in social media) होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील ही घटना आहे. एका कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्यानंतर गावातील दोन गटांत जोरदार राडा झाला. दोन्ही गटांतील पुरुष, महिला इतकेच नाही तर लहान मुले सुद्धा एकमेकांवर दगड भिरकावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. वृद्ध दाम्पत्याची हत्या करणारे चार दिवसांत गजाआड, 'या' क्लूच्या आधारे पोलिसांनी आवळल्या मुसक्या या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. बकरी चोरी सीसीटीव्हीत कैद, VIDEO VIRAL जालना जिल्हाचा सीमावर्ती भाग असलेल्या बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातील परिसरात बैल, बकऱ्या अशा मुक्या जनावरे चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विक्रम वानर्से या शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातून देखील 20 हजार रुपये किमतीची एक बकरी चोरट्यांनी चोरून नेली. शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी एका दुचाकीवरून ही बकरी चोरून पोबारा केला. दरम्यान, दुचाकीवरून बकरी चोरून घेऊन जाताना अचानक गाडीतील पेट्रोल संपले. पेट्रोल भरण्यासाठी गेले असता बकरीचोर पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Published by:Sunil Desale
First published: