भाजपतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भर सभेत नाव न घेता फडणवीसांवर घणाघाती आरोप

भाजपतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भर सभेत नाव न घेता फडणवीसांवर घणाघाती आरोप

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता खडसे यांनी भर सभेत नाराजी व्यक्त केली. लोक पक्ष सोडून जावेत, अशी वागणूक दिली जात आहे, असं ते म्हणाले.

  • Share this:

परळी, 12 डिसेंबर : दिवंगत भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त परळीतल्या गोपिनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यामध्ये पंकजा यांच्याबरोबर लक्षवेधी ठरलं एकनाथ खडसे यांचं बोलणं. खडसे काय बोलणार, पक्ष सोडणार का याकडे लक्ष होतं. कुठलीही औपचारिक घोषणा या नेत्यानं केलेली नसली, तरी त्यांनी राज्यातल्या पक्षनेतृत्वावर तोफ डागली तीसुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता खडसे यांनी भर सभेत नाराजी व्यक्त केली. लोक पक्ष सोडून जावेत, अशी वागणूक दिली जात आहे, असं ते म्हणाले. आम्ही त्यांना मोठं केलं. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असंही खडसे म्हणाले.

खडसे यांनी नेमके काय आरोप केले?

आज मुंडे असते तर अशी परिस्थिती ओढवली नसती.

मुंडेच्या मतदानसंघातून पंकजा पराभूत झाल्या हे दु:ख.

हा पराभव घडला नाही, पराभव घडवला गेला आहे.

पराभूत करण्याचं पाप डोक्यात का आलं?

ज्यांनी पक्ष मोठा केला त्यांना का डावललं?

वाचा - शिवसेनेत जाणार का? उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खडसेंनी केला खुलासा

काही केलं नसताना पंकजा मुंडेंवर आणि माझ्यावर आरोप झाले.

मुंडेंनीच फडणवीसांना पक्षाचं अध्यक्ष केलं.

माझ्या संमतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते.

आम्ही ज्यांना मोठं केलं त्यांचाकडून ही अपेक्षा नव्हती.

जनतेला आजचं चित्र मान्य नाही.

LIVE : 'मी आता भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही'

हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे असं मुंडेंनी केलं नाही.

गोपीनाथ मुंडेंनी कधीही पाठीत खंजीर खुपसला नाही.

लोक पक्ष सोडून जावेत अशी वागणूक दिली जात आहे.

जी वेळ माझ्यावर आली ती पंकजावर येऊ नये.

गोपीनाथ मुंडे असते तर मीच मुख्यमंत्री असतो

पाच वर्षांपूर्वी औरंगाबादच्या स्मारकासाठी जागा दिली

पाच वर्षात स्मारक उभं राहील अशी आसा होती, पण काम झालं नाहीं

जास्त बोललं तर शिस्तभंग होईल, आधीच माझं तिकीट कापलं गेलं, माझा गुन्हा काय होता हे तर सांगा.

 

First published: December 12, 2019, 3:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading