मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवाद्याची स्थगिती

मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवाद्याची स्थगिती

पर्यावरण आणि वन खात्याच्या परवानग्याशिवाय हे काम सुरु होतं. परवानग्या घेतल्यानंतरच काम सुरु करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवाद्याने दिले आहेत.

  • Share this:

गडचिरोली,06 ऑक्टोबर: मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाचे बांधकाम थांबवण्याचे राष्ट्रीय हरित लवादाने तेलंगणा सरकारला आदेश दिले आहेत. या आदेशामुळे तेलंगणा सरकारला मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर सिरोंचाजवळ तेलंगणा सरकारनं या प्रकल्पाचं काम सुरु केलं आहे. तेलंगणा सरकारचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी गावांचाही या प्रकल्पाला विरोध आहे. वन आणि पर्यावरणाचे नियम तोडुन कुठल्याही परवानग्या नसताना काम सुरु केल्याचा या प्रकल्पावर आरोप आहे. या आरोपावरुन हरित लवादाने कामांना स्थगिती दिली आहे. पर्यावरण आणि वन खात्याच्या परवानग्याशिवाय हे काम सुरु होतं. परवानग्या घेतल्यानंतरच काम सुरु करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवाद्याने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी लोकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात या प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं. पण तेव्हा लोकांच्या प्रश्नांचे उत्तर न देता तिथून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

आता या प्रकरणी तेलंगणा सरकार पुढे काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 6, 2017, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading