Home /News /maharashtra /

त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने मित्र चिडले, 7 जणांनी कोयत्याने सपासप वार करून संपवले

त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसने मित्र चिडले, 7 जणांनी कोयत्याने सपासप वार करून संपवले

तीन दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी अचानकपणे यशवर धारदार शस्त्र आणि कोयत्याने हल्ला केला. यशच्या डोक्यात तसंच हातावर सपासप वार केले.

आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 24 मे : मोबाईलवर स्टेटस ठेवून चिथावणी देण्याच्या वादातून खून झाल्याची गंभीर घटना मावळ तालुक्यातील टाकवे या गावात घडली आहे. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या क्षुल्लक कारणाने घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. यश असवले या 22 वर्षीय तरुण उद्योजकावर सात जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला आहे. जेवण केल्यानंतर शतपावलीसाठी आपल्या दोन मित्रांसोबत यश घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर  रात्री दहा वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी अचानकपणे यशवर धारदार शस्त्र आणि कोयत्याने हल्ला केला. यशच्या डोक्यात तसंच हातावर सपासप वार केले.  रक्ताच्या थारोळ्यात जखमी झालेल्या यशला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हेही वाचा -धक्कादायक! आईचं आजारपण सांगून मिळवला पास, खोटं बोलून पोहचला रेड झोनमध्ये आणि... या संपूर्ण खूना संदर्भातील घटनेचा तपास करत असतांना वडगाव पोलिसांनी तीन पथके तयार करून घटनेसंदर्भात समांतर तपासाला सुरुवात केली. त्यात व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवण्यावरून याआधीही गावात मृत यश तसंच आरोपी यांच्यात भांडणे होऊन गुन्हा दाखल असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. हाच धागा पकडत पोलिसांनी पुढे तपासाची चक्र फिरवली. यातून ऋतिक असवले या तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता व्हॉट्सअ‍ॅपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवण्याच्या वादातून यश याचा खून आपल्या मित्रासोबत मिळून संगनमताने केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. हेही वाचा -मठापतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या त्यानुसार पोलिसांनी अवघ्या पाच तासात ऋतिक अस्वले, अजय जाधव, अतिश लंके, विकास रिठे, ऋतिक चव्हाण, अश्विन चोरगे, निखिल काजळे यांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींनी पूर्ववैमनस्यातून यशचा खून केल्याची बाब पोलीस तपासात पुढे आणली असून पोलिसांनी कलम 302 प्रमाणे सातही आरोपीवर गुन्हा दाखल केला असून यासंदर्भातील पुढील तपास वडगाव पोलीस आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या