कोपर्डीत 'निर्भया'चा पुतळा हटवणार

वाद होऊ नये म्हणून हा पुतळा हटवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2017 05:21 PM IST

कोपर्डीत 'निर्भया'चा पुतळा हटवणार

15 जुलै : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 'निर्भया'च्या कुटुंबियांनी पुतळा उभारला होता. मात्र, वाद होऊ नये म्हणून हा पुतळा हटवण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतलाय.

कोपर्डी प्रकरणाला वर्ष पूर्ण झालंय. पण अजूनही निर्भयाला न्याय मिळाला नाही. तिच्या आठवणीत एक स्मारक उभं करण्याचा निर्णय पीडितेच्या कुटुंबियांनी घेतला होता. मात्र हे स्मारक नक्की कुणाला आणि काय प्रेरणा देणार अशी भूमिका मांडत संभाजी ब्रिगेडने या स्मारकाला विरोध दर्शवला होता.

त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी गुरुवारी मध्यरात्री पीडितेचा पुतळा याठिकाणी उभारलाय. पण या पुतळ्यावरुन वाद निर्माण झालाय. संभाजी ब्रिगेडनं हा पुतळा सन्मानपुर्वक काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे वाद टाळण्यासाठी निर्भयाच्या कुटुंबियांनी हा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...