Home /News /maharashtra /

अमरावतीत तणाव, आता शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

अमरावतीत तणाव, आता शिवसेनेनं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

Amravati Breaking News: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा हटवण्यात आला आहे.

अमरावती, 17 जानेवारी: अमरावतीतून (Amravati) एक मोठी बातमी समोर येतेय. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर (Daryapur) येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा हटवण्यात आला आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं ही कारवाई केली आहे. रविवारच्या रात्री शिवसेनेने शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. दर्यापूर येथीलही पुतळा अनधिकृत असल्यानं शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला आहे. यानंतर दर्यापूर येथे पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे आता दर्यापूर येथे तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमरावती शहरात राजापेठ उड्डाणपुलावरील महापालिकेचे पुतळा हटविल्यानंतर अमरावती शहरात तणाव निर्माण झाला होता दरम्यान अमरावतीच्या ग्रामीण भागातील दर्यापूर येथे देखील मध्यरात्री विनापरवानगी बसविलेला पुतळा हटविल्याने दर्यापूर शहरात सकाळपासून तणाव निर्माण झालाय त्यामुळे आज सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी दर्यापूर बंदची हाक दिलेली आहे पुतळा हटवल्याने पालिकेचा निषेध देखील करण्यात येतो आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दर्यापूर शहरात तैनात करण्यात आलेला आहे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेही निर्माण होऊ नये या परिस्थितीवर पोलीस लक्ष देऊन आहेत. काल आमदार रवी राणा यांनी राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपाने हटवला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने (Municipal Corporation) हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी विना परवानगी शिवरायांचा हा पुतळा बसविला होता. विनापरवानगीने राजापेठ येथील उड्डाणपुलावर (Rajapeth flyover) शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा काल पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते. दरम्यान यात मनसेने देखील उडी घेतली. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा सत्कार करून राणा दाम्पत्याचे आभार मानले होते. तर मनसेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाआरती करून महाराजांना मानाचा मुजरा, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांना सुद्धा दिल्या होत्या. दरम्यान या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण पेटले मात्र अद्यापही याला मनपाने परवानगी दिलेली नाही. आमदार रवी राणांच्या घरातून कार्यकर्ते ताब्यात पोलिसांनी (amravati police) कारवाईचा बडगा उगारत रवी राणा यांच्या घरातून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रवी राणा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले असून तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी खासदार नवनीत राणा (mp navneet rana) यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी कोणतीही परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पोलिसांनी या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काल पोलिसांनी धडक कारवाई करत आमदार रवी राणा यांच्या घरी जमलेल्या आरोपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या