मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकार ठाम! 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, आरोग्य विभागानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

राज्य सरकार ठाम! 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार, आरोग्य विभागानं जारी केल्या मार्गदर्शक सूचना

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही

आता शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 29 नोव्हेंबर: कोरोनाचा (Corona Virus) नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळल्यानंतर शाळा सुरु होणार की नाही यासाठी संभ्रम निर्माण झाला. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी माहिती दिली. शाळा (School Reopen) ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.

येत्या एक डिसेंबरपासून राज्यात शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं मार्गदर्शक सूचना दारी केल्या आहे. या सूचनांमध्ये शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी नियमांचं करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

आरोग्य विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे

काय म्हणाले राजेश टोपे

ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रात तूर्तास तरी काही प्रभाव नसल्याने चिंतेचा कारण नाही मात्र काळजी घेणं गरजेचं असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर शाळा उघडण्याच्या निर्णयाबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरलाच सुरू होणार असल्यासाचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय.

अजून तरी ओमिक्रॉनच्या संदर्भातली राज्याला अजूनही कुठलीच भीती नाही. कारण त्याचं अजून कुठेही लागण झाल्याचं दिसत नाही. तसा कोणत्याही जिनोम स्विकिंगचा रिपोर्ट नाही. त्यामुळे त्याची आज चिंता बाळगण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एवढ्या पद्धतीनं लागण झाली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घेतली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, शाळा ही ठरल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार 1 डिसेंबरला सुरू होईल.

शाळेबाबत आरोग्य विभागाने परवानगी दिली असली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे. पियाड्रिक स्टाफने अगोदरच या बाबत अनुकलता दाखवली असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Rajesh tope, School