मी पक्षाचा असतो तर शरद पवार, सोनीया गांधी, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची सभा घेतली असती तर तुम्ही निवडूण दिलं असतं पण मला कुणी नेता नाही, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
नागपूर,24 फेब्रुवारी:'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक मतदान करतात',असे वक्तव्य करून प्रहार संघटनेचे प्रमुख आणि जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतली आहे. बच्चू कडू हे विदर्भ विद्यार्थी परिषदेत बोलत होते.
माझा कुणी नेता नाही, माझा नेता दिल्लीत नाही. मी कुणा नेत्याचा गुलाम नाही. मी जनतेचा गुलाम आहे. राजकारणात जात धर्म बघितले जातात. जात सांगता आली पाहिजे. झेंड्याचा रंग पांढरा असेल तर कुणी मतदान करत नाही. 75 ते 80 टक्के लोक जात पाहून मतदान करतात. त्यामुळे या देशाचं वाटोळं झालं. सेवा करुन मतदान मिळत नाही. झेंड्याचा रंग पाहून मतदार मतदान करतात, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
ठाकरे सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर
बच्चू कडू म्हणाले, आजकाल निवडणुकीच्या प्रचाराला हीरो आणि हीरोईन आणावी लागते. मला पण निवडणुकीच्या वेळी माझ्या प्रचाराला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना बोलवा, असे कार्यकर्ते म्हणत होते. मी या राजकारणाला फाटा दिला नाही तर बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक मतदान करतात, अशी वस्तूस्थिती त्यांनी विद्यार्थी परिषदेत मांडली. मी पक्षाचा असतो तर शरद पवार, सोनीया गांधी, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची सभा घेतली असती तर तुम्ही निवडूण दिलं असतं पण मला कुणी नेता नाही, असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
'अधिवेशनाला दांडी न मारता हजर रहा, सरकार पडणार नाही याची शाश्वती देतो'दीड हजार ग्रामपंचायतींसाठी 29 मार्च रोजी मतदान
दरम्यान, राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान, तर 30 मार्च 2020 रोजी मतमोजणी होणार आहे.
सोमवार (24 फेब्रुवारी) आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मूदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 16 मार्च 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 18 मार्च 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 29 मार्च 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होईल.
Gold Rates Today : इतिहासात पहिल्यांदाच एवढं महाग झालं सोनं, का वाढले दर?ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- 13
रायगड- 1
रत्नागिरी- 8
नाशिक- 102
जळगाव- 2
अहमनगर- 2
नंदुरबार- 38
पुणे- 6
सातारा- 2
कोल्हापूर- 4
औरंगाबाद- 7
नांदेड- 100
अमरावती- 526
अकोला- 1
यवतमाळ- 461
बुलडाणा- 1
नागपूर- 1
वर्धा- 3
गडचिरोली- 296
एकूण- 1570
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.