मुंबई, 25 मार्च : राज्यातील वरीष्ठ महाविद्यालयांबाबत राज्य सरकारने धक्कादायक अशी माहिती दिली आहे. राज्यात जवळपास साडे तीन हजार वरीष्ठ महाविद्यालयांपैकी दोन हजार महाविद्यालयांनीच नॅक मूल्यांकन प्राप्त केलं असल्याचं राज्य सरकारने विधानसभेत सांगितलं. तारांकित प्रश्नावर राज्य सरकारने लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली आहे.
राज्यात असलेल्या ३ हजार ३४६ वरीष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त १ हजार ९७३ वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहे. यात मुंबई आणि पनवेलमध्ये असणाऱ्या वरीष्ठ महाविद्यालयांच्या एकूण संख्येच्या तुलनेत नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालयांची संख्या अर्ध्याहून कमी आहे.
माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव, मला रात्रभर..; खडसेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई आणि पनवेल मधील ६६८ वरीष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी फक्त २७३ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहेत. सर्वांत कमी नॅक मुल्यांकन प्राप्त महाविदयालय मुंबई आणि पनवेल मध्ये आहेत. नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांच्या संलग्नतेसाठी महत्त्वाचे ठरते. जर नॅक मुल्यांकन महाविद्यालयांना मिळाले नाही तर अनुदान आणि संलग्नता मंजूर करता येणार नाही. नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार असल्याचंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.