डान्स बारवर पुन्हा बंदी? अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली

डान्स बारवर पुन्हा बंदी? अध्यादेश आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण डान्स बार सुरू करण्यास सरकार अनुकूल नाही.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : डान्स बारवर पुन्हा बंदी आणण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी सरकार लवकरच अध्यादेश आणणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण डान्स बार सुरू करण्यास सरकार अनुकूल नाही. त्यामुळे पुन्हा बंदी आणण्यासाठी सरकारकडून आधी कायदेशीर मार्गाचा वापर केला जाईल.

कायदेशीर लढाईत जर सरकारला अपयश आलं तर सरकार डान्स बारबंदीसाठी थेट अध्यादेश आणणार आहे. त्यामुळे डान्स बारच्या चालकांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.

'मुख्यमंत्री याबाबत सविस्तर अभ्यास करून भूमिका जाहीर करतील. आर आर पाटील यांना त्यावेळी आम्ही एकमुखाने पाठिंबा दिला होता. आता वेगळी भूमिका असण्याचा विषय नाही,' अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

काय आहे कोर्टाचा नवा निर्णय?

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने आपला निर्णय देताना राज्य सरकारने सुचवलेल्या काही अटी कायम ठेवल्या आहेत, तर काही अटींमध्ये बदल केला आहे. डान्स बार संध्याकाळी 6.30 ते 11.30 पर्यंत सुरू राहणार आहेत.

VIDEO : छेड काढणाऱ्या परप्रांतियांना विद्यार्थिनींनीच बदडून काढलं

First published: January 18, 2019, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading