मुंबई, 29 ऑक्टोबर: राज्यावर अचानक आलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवभोजन थाळीला पुढील 6 महिन्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी 5 रुपायांतच मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र, ऑनलाइन/ ऑफलाइन शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहणारे बंधणकारक ठरणार आहे.
हेही वाचा..राज्य सरकारचा नवा आदेश; शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना महत्त्वाची सूचना
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले इतर महत्त्वाचे निर्णय...
-शिवभोजन थाळीचा दर 1 ऑक्टोबर 2020 पासून पुढील 6 महिन्यांसाठी 5 रुपये करण्यास मान्यता.
-मुदत संपलेल्या व कोरोना विषाणु संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार. अध्यादेश काढण्यास मान्यता.
-सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार.
-राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता.
-राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना.
-धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द. नव्याने निविदा मागविणार.
-मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर.
राज्य सरकारचा नवा आदेश...
दरम्यान, गेल्या 7 महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळांचे दरवाजे आता पुन्हा एकदा उघडणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात नवा निर्णय घेतला आहे. याबाबत शासनादेशही (जीआर) प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहणारे बंधणकारक ठरणार आहे.
शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन, ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शासकीय, खासगी, अनुदानित विना अनुदानित सर्व शिक्षण संस्थांसाठीही हा आदेश असणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे.
हेही वाचा...अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार, CM राज्यपालांना भेटण्याची शक्यता
याआधी 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली जाहीर केली होती. यात शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येण्यास परवानगी देण्यात आली होती. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे.