सिंधुदुर्ग, 29 जून : पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडकला उडाला आहे. दरवाढीविरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, दावाच विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीवरचे खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं.
'इंधन दरवाढीचा निर्णय हा पेट्रोल कंपन्या घेत असतात. राज्य सरकार जे कर लावते, त्यामुळे दरवाढ होत असते. भाववाढीचा नीट अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून राजकारण करत आहे.' असा आरोपच दरेकर यांनी केला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार - प्रवीण दरेकरांचा आरोप pic.twitter.com/SX7RJ0WFBc
— News18Lokmat (@News18lokmat) June 29, 2020
पेट्रोल-डिझेल दरवाढीचं राजकारण करुन मोदी सरकारला टार्गेट केले जात आहे. फडणवीस सरकारच्या काळात डिझेल-पेट्रोल वरचा व्हॅट कमी केला होता. त्यावेळी इंधनाचे दर कमी झाले होते. पण आता राज्य सरकारने वेगवेगळे कर लावले आहे. जर हे कर कमी केले तर पेट्रोल डिझेल दरवाढ होणार नाही, अशी माहितीही दरेकरांनी दिली.
भाजप आमदाराला कोरोना, फडणवीसांसह शरद पवारांच्या बैठकीला होते हजर!
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेतृत्त्व आहे. त्याच्यामुळे गोरगरिबांना गॅस सिलेंडर असो किंवा इतर सोईसुविधा देण्यासाठी काम करत आहे' अशी स्तुतीसुमनंही दरेकर यांनी उधळली.
'राज्य सरकारकडून केवळ घोषणा अन् घोषणा होतात. सरकारला वाटत आम्ही खंबीर आहोत, स्वतःलाच सरकार स्थिर आहे जे सांगावं लागतं याचा अर्थ पूर्णपणे त्या तीन पक्षांमध्ये काही नीट चाललेले दिसत नाही. नाराजी आहे ती बाहेर येत आहे, अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विविध विषयांवर वाद आहेत. मला वाटतं असं तीन विचारधारेच सरकार फार काळ चालत नसते' असंही दरेकर म्हणाले.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.