राज्य सरकारकडून तळीरामांना खुशखबर, गावागावात मिळणार दारू!

राज्य सरकारकडून तळीरामांना खुशखबर, गावागावात मिळणार दारू!

80 हजार तरुणांना रोजगार मिळावा आणि अवैध दारू थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 14 जानेवारी : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता राज्य सरकारने तळीरामांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 3 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दारू दुकानाला परवानगी देण्याचा निर्णय राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घेतला, असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

'लोकांनी लाखो रुपये खर्च करून गुंतवणूक केली आहे. तसंच 80 हजार तरुणांना रोजगार मिळावा आणि अवैध दारू थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला', असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे.

हायवेरील दारूची दुकाने पुन्हा सुरू होणार!

'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, हायवे लगत 500 मीटर अंतरावर असलेली दारूची दुकाने, बार बंद झाली होती. पण, यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा महसुल वाढला याचाच अर्थ दारू पिणारे कमी झाले नाही, धाब्या धाब्यावर आणि हॉटेलमध्ये लोकं अवैध दारू पित होते. त्यामुळे नियमानुसार दारू मिळावी यासाठी हा निर्णय घेतला', असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे महानगर पालिका क्षेत्रापासून तीन किलोमीटर अंतरावरील गावात आणि नगर पालिका क्षेत्रापासून एक किलोमीटर अंतरावर कितीही लोकसंख्येच्या गावात दारूचे दुकान आता उघडता येणार आहे.

3 हजार दुकानं पुन्हा सुरू होणार!

या गावांमध्ये जरी हायवे असेल तरीही ही दुकाने सुरू होतील. त्याला पाचशे मीटरची बंदी असणार नाही. या निर्णयामुळे राज्यात जवळपास बंद असलेली सुमार 3 हजार दारूची दुकान पुन्हा सुरू होणार आहे.

2011 मध्ये ज्या गावांची लोकसंख्या ही 3000 होती, ती 5 हजार झाली असं सरकारनं गृहित धरलं असं बावनकुळेंनी सांगितलं आहे.

===================

First published: January 14, 2019, 8:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading