Home /News /maharashtra /

फडणवीस यांनी केले शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत, म्हणाले...

फडणवीस यांनी केले शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत, म्हणाले...

'राज्यात शरद पवार यांच्या सारखा जाणकार नेता कुणीच नाही. त्यांना चांगले माहिती आहे केंद्र सरकार कसे काम करते, राज्य सरकारला कसे काम करावे लागते'

    उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीनिधीवरून राजकीय आखाडा तापला आहे. भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. त्यांच्या सारखा जाणकार नेता राज्यात दुसरा नाही, असंही फडणवीस म्हणाले. 'शरद पवार यांनी उस्मानाबाद भागाची पाहणी केली आहे. त्यांनी सांगितले की, आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे, त्यांचा हा सल्ला चांगला आहे. कर्ज काढणे हे काही पाप नाही. आपले जे बजेट आहे. त्यातील 70 ते 80 टक्के रक्कम कर्जातून येते. आपल्याला 1 लाख 20 हजार कोटींचं कर्ज काढता येते. आतापर्यंत 60 हजार कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करता येईल', असं म्हणत फडणवीस यांनी पवारांच्या भूमिकेचे स्वागत केले. एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया त्याचबरोबर ठाकरे सरकारवर टीका करत फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा सुद्धा साधला. 'राज्यात शरद पवार यांच्या सारखा जाणकार नेता कुणीच नाही. त्यांना चांगले माहिती आहे केंद्र सरकार कसे काम करते, राज्य सरकारला कसे काम करावे लागते. पैसे कुठून येतो याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.  पण, पवार हे सरकारला कसे वाचवता येईल एवढेच बोलत आहे. शरद पवार हे सरकारचा नाकर्तेपणा झाकून ठेवत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'शरद पवार हे काही खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नक्की भेट घेतली पाहिजे. पंतप्रधानांना भेटण्यामध्ये काहीही गैर नाही. आम्ही सुद्धा पंतप्रधानांकडे विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आम्ही जावे, याची आवश्यता नाही, असंही फडणवीस म्हणाले. क्षणात उद्धवस्त करणार शक्तीशाली BRAHMOS सुपरसॉनिक मिसाइल, पाहा VIDEO 'शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी केंद्र सरकारला आधी विनंती केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकारकडून मदत आल्यावर योग्य ती मदत पाठवण्यात यावी. मी अमित शहा यांच्याशी बोललो काय, किंवा उद्धव ठाकरे बोलले तरी मदत ही तेवढीच मिळणार आहे. राज्यातला दौरा पूर्ण केल्यानंतर अमित शहा यांच्याकडे पूर्ण माहिती देणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या