Home /News /maharashtra /

Remdesivir बाबत मोठा निर्णय; जिल्हास्तरावर होणार नियंत्रण कक्षाची निर्मिती

Remdesivir बाबत मोठा निर्णय; जिल्हास्तरावर होणार नियंत्रण कक्षाची निर्मिती

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरची (Remdesivir injection) चढ्या दरात विक्री केली जात आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 10 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती (Corona pandemic) नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णात (Corona patients) वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लुटही सुरू आहे. कोरोना विषाणूच्या उपचारासाठी अति महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir injection) काळाबाजारही (Black Marketing on Remdesivir) समोर येत आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री चढ्या दराने केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येत आहे, पण रेमडेसिवीरचा काळाबाजार वाढतचं चालला आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरची चढ्या दरात विक्री केली जात आहे. त्यामुळे हा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम उभारण्याच्या (Remdesivir injection Control room) सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात रेमडेसिवीरच्या इंजेक्शच्या बाबतीत सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (हे वाचा-'आम्हाला खूप वर्कलोड' म्हणत यमराजच उतरले रस्त्यावर, नियमांचं पालन करण्याचं आवाहन) सध्या राज्य कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत खाजगी दुकानदार वाढीव दराने रेमडेसिवीरची विक्री करत आहेत. त्यामुळे आता संबंधित दुकानदारांच्या वसुलीबाजीची तक्रार करणं सोपं झालं आहे. येथून पुढे ऑक्सिजन कंट्रोल रूममध्येच रेमडेसिवीरबाबतच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. परिणामी राज्यात कुठेही रेमडेसिवीरबाबत गैरप्रकार आढळला तर जवळच्या ऑक्सिजन कंट्रोलकडे तक्रार दाखल करता येणार आहे. (हे वाचा-नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री) या तक्रारींचे निराकरण स्थानिक FDA च्या कार्यालयकडून केले जाणार आहेत. त्याचबरोबर गरज भासल्यास राज्य स्तरावरील FDA च्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत रँडम पद्धतीनं खाजगी रुग्णालयाला भेटी दिल्या जाणार आहेत. दरम्यान रुग्णालयात रेमडेसिवीरचा योग्य वापर केला जात आहे की नाही? याची पाहणी तपासणी करावी, अशा सूचना आरोग्य यंत्रणेच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona spread, Maharashtra News

पुढील बातम्या