भरारी पथकाचा छापा, 11 लाख 61 हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

भरारी पथकाचा छापा, 11 लाख 61 हजारांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

पुणे-बंगळुरू नॅशनल हायवेवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री गस्त घालून पोलिसांनी ही कारवाई केली.

  • Share this:

कोल्हापूर, 18 फेब्रुवारी : वाठार येथील पुणे-बंगळुरू नॅशलन हायवेवर राज्य उत्‍पादन शुल्क विभाग आणि भरारी पथकाने छापा टाकून 11 लाख 61 हजार 400 रूपये इतक्या किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. पुणे-बंगळुरू नॅशनल हायवेवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री गस्त घालून पोलिसांनी ही कारवाई केली.

संशयित वाहनांची तपासणी करत असताना वाठार (ता. हातकणंगले) गावच्या हद्दीत पुणे-बंगळुरू नॅशनल हायवेवर हॉटेल सुशांतच्या समोर असणाऱ्या सेवा रस्त्यावर एक आयशर कंपनीचा माल वाहतूक ट्रक (क्र MH07-AJ-0145) संशयितरित्या थांबल्याचे निदर्शनास आले. पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालकास वाहनामध्ये काय माल आहे, याबाबत विचारणा केली. त्यानंतर वाहनात त्रिफळा वनस्पतीच्या वाळलेल्या लहान कांड्यांनी भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले.

पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनात प्रवेश करुन पाहणी केली असता प्रथमदर्शनी चालकाने सांगितल्याप्रमाणे गोण्या दिसून आल्या. परंतु कर्मचऱ्यांचा संशय बळावल्याने त्यांनी अधिक शोध केला असता गोण्यांच्या खाली लपवलेले बॉक्स दिसून आले. त्यामध्ये विविध ब्रँडचे गोवा बनावटीचे अवैधरित्या आणलेले विदेशी मद्य असल्याचे आढळून आले.

इंदुरीकरांच्या समर्थकाची बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना पाहून तुमच्या अंगावर येईल काटा

याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप विश्वनाथ निगरे, (वय 58, रा. घर नं.-17, खारेपाटण, ता. कणकवली, ता. सिंधुदुर्ग) आणि महेश तुकाराम कारंडे (वय 42, रा. कोष्टीवाडी, खारेपाटण, ता. कणकवली, ता. सिंधुदुर्ग) या दोघांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांचे रॉयल स्टॅग, गोल्डन एस.ब्ल्यु व्हिस्की, मॅकडॉल नं. 01 या ब्रँडच्या 750 मिलीचे 67 बॉक्स इतके मद्य मिळाले असून त्याची बाजारभावानुसार एकूण 5 लाख 6 हजार 400 इतकी किंमत आहे.

गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर मुद्देमाल, मोबाईल संच यांची एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 11 लाख 61 हजार 400 इतकी आहे. उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, जवान सर्वश्री संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 08:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading